योग्य पद्धतीने चेहरा पुसा, नाहीतर वेळेआधीच दिसाल वृद्ध !

0
आपला चेहरा म्हणजे पर्सनॅलिटीचं सर्वात मोठं आकर्षण ! त्यामुळे चेहरा धुताना आणि पुसताना योग्य काळजी घेतली तर तुमच्याच फायद्याचे ठरेल !



थंड किंवा कोमट पाणी वापरा !
बरेच जण चेहरा गरम पाण्यानी धुतात, जे चेहऱ्यासाठी चांगलं नसतं. कारण गरम पाणी त्वचेला रखरखीत करतं. इतकेच नाही तर त्वचेवर सुरकुत्याही पडायला लागतात. त्यामुळे चेहरा नेहमी कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने धुवा.

फेसवॉश वापरा !
आता साबणाने चेहरा धुवावा की नाही हा मोठा प्रश्न आहे असे म्हणाल. साबणाने चेहरा धुतला तर त्वचा फार कोरडी आणि रखरखीत होते. त्यामुळे त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉशचा वापर केल्यास तुमच्या फायद्याचे ठरेल.

चेहरा धुवून मग झोपा !
अनेकजण झोपण्यापूर्वी चेहरा धुत नाहीत. दिवसभर चेहऱ्यावर धुळ, घाण साचलेली असते आणि यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतात. त्वचा श्वास घेऊ शकत नाही आणि या कारणाने त्वचा कोरडी होते. ही सर्व वेळेआधी वृद्ध दिसण्याची लक्षणे आहेत.

स्क्रबिंग करा !
आठवड्यातून एकदा स्क्रबिंग करणे गरजेचे आहे. स्क्रबिंग केवळ महिलांच्याच त्वचेसाठी गरजेचे नाही तर प्रत्येक त्वचेसाठी गरजेचं आहे. पुरुषांनी स्क्रब केल्यास दाढीही चांगली येते आणि मृत सेल्स चेहऱ्यावरुन निघून जातात. तसेच याने चेहऱ्याचा रंग उजळतो.

चेहरा घासून पुसू नका !
चेहरा धुतल्यानंतर जोरात घासून पुसणे हे अत्यंत चुकीचे आहे. कधीही चेहरा हळूहळू कोरडा करा. त्वचा आधीच नाजूक असते त्यात तुम्ही जोर लावल्यावर अधिक नुकसान होण्याची जास्त शक्यता असते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top