striming ?

0
*_गरम पाण्याने वाफ घेणे म्हणजे सौंदर्यप्रसाधनंपैकी एक स्टीमिंग करणे होय._*
_*गरम पाण्याने चेहऱ्यावर वाफ घेतल्याने काय काय फरक जाणवतो ते खालील प्रमाणे पाहुया:*_

*चेहऱ्यावरील छिद्रे उघडली जाऊन त्यात अडकलेली धूळ, मातीचे कण घामा वाटे निघून जाऊन चेहरा स्वच्छ राहतो.*
*वाफ घेतल्याने पिंपल्स पसरविणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि त्वचा पुन्हा श्वास घेऊ लागते.*
*आपल्या चेहऱ्यावरचे सर्व डाग नाहीसे होतात आणि चेहरा खूप स्वच्छ दिसू लागतो.*
*थंडीत बहुतांश जणांची त्वचा रुक्ष होते.* *अशावेळी स्टीमिंग केल्यास त्वचेचा रुक्षपणा दूर होऊन चेहऱ्याची चकाकी वाढते.*
*सर्दी/कफ झाला असल्यास गरम पाण्याच्या वाफेचा फायदा होतो.*

*चेहऱ्यावर वाफ घेताना गरम पाण्यात हळद/तुळशीची पाने/पुदिन्याची पाने/लिंबू/फुलांच्या पाकळ्या/किंवा कोरफड यांपैकी कोणतेही जिन्नस टाकून वाफ घेतल्यास अधिक फायदा होतो.*

*ध्यानात घ्या, रोज गरम पाण्याने वाफ घेऊ नए. अश्याने चेहरा काळा पडू शकतो किंवा जळु शकतो. शक्यतो १० दिवसातून एकदा वाफ घ्यावी.*

*आपल्या चेहऱ्याला स्टीमरजवळ असू द्या मात्र, आपला चेहरा वाफेने जळू नये याचीही काळजी घ्या. यासाठी आपल्या डोळ्यांना बंद ठेवा आणि श्वासाद्वारे वाफेला आत ओढा. जर पाणी जास्त गरम असेल तर डोक्याला लगेच त्यावरून हटवा आणि वाफ सहन करण्यासारखी असेल तर पुन्हा त्याच्याजवळ या.  १०-१५ मिनिटानंतर आपल्या चेहऱ्याला थंड पाण्याने धुवा.*

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top