जर तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला असेल आणि त्यातील वैयक्तिक डेटा लीक होईल अशी चिंता तुम्हाला सतावतेय तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यातील डेटा सहज तुम्ही डिलीट करू शकता.
हायलाइट्स:
- चोरी गेलेल्या फोनमधील डेटा करा डिलीट.
- हरविलेला फोन शोधणे देखील सोप्पे.
- फॉलो करा या टिप्स.
स्मार्टफोन नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकडे एक मॉडर्न फोन आजकाल असतोच. इतकेच नाही तर बरीच महत्वाची माहिती देखील फोन्समध्ये असते. अशात, एखाद्या वेळेस स्मार्टफोन हरवला आणि त्यातील माहितीचा कुणी दुरुपयोग केला तर अडचणी वाढू शकतात. तुम्हाला सुद्धा हेच टेन्शन असेल तर घाबरायचे कारण नाही. यावर एक मार्ग आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही चोरी गेलेल्या फोनमधून डेटा डिलीट करू शकता. पाहा डिटेल्स.
- वैयक्तिक डेटा चोरी लेल्या किंवा हरविलेल्या स्मार्टफोनवरून डिलीट करण्यासाठी प्रथम https://mydevices.google.com वर जावे लागेल.
- नंतर चोरी गेलेल्या डिव्हाइसमध्ये वापरलेल्या आयडीसह लॉग इन करावे लागेल.
- येथे तीन पर्याय दिसतील, ज्यात प्रथम प्ले साउंड, दुसरे सेक्योर डिव्हाइस आणि तिसरा इरेज डिव्हाइस आहे.
- या तिघांपैकी इरेज डिव्हाइस पर्याय निवडा.
- आता आपल्याला जीमेल आयडीचा पासवर्ड विचारला जाईल, तो प्रविष्ट करा.
- आपण पासवर्ड प्रविष्ट करताच आपला वैयक्तिक डेटा चोरीच्या स्मार्टफोनमधून स्वयंचलितपणे हटविला जाईल.
- चोरी झालेल्या स्मार्टफोनवर इंटरनेट सुरु असेल तरच ही प्रक्रिया कामी येईल.
- असा शोध स्मार्टफोन
- हरविलेला स्मार्टफोन शोधू इच्छित असल्यास, प्रथम Find My Device वेबसाइटवर जावे लागेल.
- चोरी गेलेल्या डिव्हाइसवर वापरलेल्या Google खात्यासह येथे लॉग इन करा.
- Google मॅप्सवर आपल्या हरवलेल्या स्मार्टफोनचे शेवटचे लोकेशन दिसेल.


