सर्वसामान्य कॉलला रेकॉर्ड करणे खूपच सोपे आहे. व्हॉट्सअॅप कॉलला रेकॉर्ड करणे थोडे अवघड आहे. मात्र,एका सोप्या ट्रिकद्वारे तुम्ही WhatsApp कॉलला रेकॉर्ड करू शकता.
WhatsApp कॉलला कसे रेकॉर्ड कराल ?
- यासाठी सर्वात प्रथम तुमच्या फोनमध्ये Google Play Store वर जाऊन Call Recorder - Cube ACR हे अॅप इंस्टॉल करा. यात व्हॉट्सअॅप लॉग इन करा.
- यानंतर या अॅपला डाउनलोड करा व आवश्यक ती परमिशन द्या.
- यानंतर WhatsApp वर स्विच करा आणि Next Bar मध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीशी बोलायचे आहे त्याला कॉल करा.
- जर तुम्हाला अॅप मध्ये काही समस्या जाणवल्यास रेकॉर्डर सेटिंगमध्ये जाऊन वॉयस कॉलसाठी Force VoIP कॉलला बदलावे लागेल.
- यानंतर पुन्हा कॉल करा आणि WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा.
- यानंतर तुमचे WhatsApp कॉल आपोआप रेकॉर्ड होतील.

