एखादा जीवनमूल्यात्मक साधा शोध अनेक अनवट वाटा समोर ठेवतो.
त्वचेवरील शहा-यांसाठी आणि प्राणांच्या जाणीवेसाठी.
वाटा म्हणजे असतात दरवाजे नुसते मिट्ट काळोखातले.
जसे झाड नसते दिसत फांद्या नुसत्या चंद्रप्रकाशात.
आणि अचानक एखाद्या वाटेवरून येते ऍम्ब्युलन्स
दुस-या वाटेनं येते कधी शववाहिका कधी पोलिस व्हॅन
तिस-या वाटेनं कधी स्कूल बस कधी कोंबड्यांचा टेंपो कधी दुधाची गाडी
चौथ्या वाटेनं.कधी भाज्यांची गाडी नाशिकहून कधी पोस्टाची व्हॅन.
पाचव्या वाटेनं, कधी बॅंकेच्या तिजोरीची गाडी कधी शेतक-याची बैलगाडी
असं एकेका वाटेनं,कधी शाळेत जाणा-या मुलाची सायकल
कधी हमालाची हातगाडी कधी कामावर जाणा-या
पुरूषाची वा बाईची स्कूटर वा बाईक किंवा कार
कधी चार सिट्स भरलेली रिक्षा कधी एक घोड्याचा टांगा.
कधी अनेक माणसांचा पाठिंबा असलेली प्रेतयात्रा.
कधी समोरासमोरच्या वाटांवरून परस्परविरोधी राजकिय मोर्चे
कधी माणसांची गर्दीच गर्दी एकमेकांच्या पुढे वाट काढणारी.
शोध
डिसेंबर १३, २०१८
0
Tags

