बाजारभाव गडगडले

0

बाजारभाव गडगडले

जागेवरच सडले

कांद्याने बळीराजाला

भर बाजारात रडवले

ना आधुनिकतेला वाव

ना पारंपरिकतेला भाव

पोशिंद्याच्या जुन्या जखमेवर

रोज रोज नवीन घाव

*(संदर्भ :-* _कांद्याचे भाव गडगडले ; बळीराजा हतबल )_

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top