असे कसे फिरले वासे
जन्मदात्रीनेच का केले असे....
पोटचा अंकुर, उदयास
तिनेच घातला... अन
अंकुराशीच आईने, जन्मावर
घाला घातला......
असे कसे फिरले वासे
जन्मदात्रीनेच का केले असे?.....
स्वतः एक स्त्री असूनदेखील
माझे स्रीअस्तित्व तिलाच
का खटकले ?......
असे कसे फिरले वासे
जनदात्रीनेच का केले असे ?....
विरोध थोडा करायचा होता
माझ्यासाठी बंड पुकारायचा होता
अन्यायाविरुद्ध पेटून उठायची होतीस
माझ्यासाठी थोडा त्याग करायची होतीस..
असे कसे फिरले वासे
जन्मदात्रीनेच का केले असे...
खरंच नाही पटले आई मला
वंशाच्या दिव्याला जपत गेलीस
माझ्याशी मात्र *प्रतारणा* केलीस
स्वतःचे *स्वत्व* घालवून बसलीस...
आई का केलीस असे...
असे कसे फिरले वासे....
जन्मदात्रीनेच का केले असे?....


